बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना हे मोदींच्या विरोधातलं षडयंत्र होतं, जे मेले त्यांना डॉक्टरांनीच मारलं”

सांगली | दक्षिण अफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या ऑमिक्रॉन व्हॅरिअंटमुळे जगभरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. ऑमिक्रॉनचे रुग्ण अनेक देशांमध्ये वाढत आहेत. यामुळे देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्या आहेत. हा विषाणू कोरोनापेक्षा अधिक धोकादायक असल्याचं अजून संशोधकांनी स्पष्ट केलेलं नाही.

एकीकडे या विषाणूची चिंता असताना दुसरीकडे मात्र कालीपुत्र कालीचरण दास यांनी याबाबत धक्कादायक वक्तव्य केलं. कोरोना विषाणूच खोटा असल्याचा दावा कालीचरण दास यांनी केला आहे. सांगलीत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे म्हटलं आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर संघटनेचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी देखील फर्जी असल्याचं कालीचरण म्हणाले. कोरोना आणि डब्ल्यूएचओ बोगस असल्याचं देखील कालीचरण दास बरळले आहेत.

अमेरिकेत रेमडेसिव्हिरवर बंदी आहे तरी भारतात हे का दिलं जातं? कालांतराने ते देखील बंद करण्यात आलं. कोरोना हे मोदींच्या विरोधातल षडयंत्र होतं, जे मेले त्यांना डॉक्टरांनीच मारलं आहे, असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी पत्रकार बैठकीत केलं आहे.

कोेरोना विषाणूच्या नव्या व्हॅरिएंटच्या पार्श्वभूमीवर सरकार गांभीर्यान पावलं उचलत आहे. मात्र कालीचरण यांच्या या वक्तव्यामुळं वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त होत आहे. देशातील हिंदू हा जातियवाद आणि भाषावादावर विभागला गेला आहे. मात्र देशावर राज्य करण्यासाठी हिंदूंनी त्याग करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सर्व हिंदू एक होऊन देशावर हिंदुचे राज्य करण्यासाठी हिंदू वोट बँक तयार करून देशाचे हिंदूकरण होणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-   

‘2014 नंतरचं स्वातंत्र्य हे असं आहे…’; शिवसेनेचा मोदींना सणसणीत टोला

ओमिक्रॉनविरोधात कोविशिल्ड पुरेशी की बुस्टर डोसची गरज?, अदर पूनावाला म्हणतात…

…म्हणून मी मानसिक धक्क्यात!, सचिन वाझेंचे अनेक धक्कादायक आरोप

देशात ओमिक्रॉनचे किती रूग्ण? केंद्राने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता, ‘या’ गावांना सतर्कतेचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More