बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गांधींबद्दल जे काही बोललो त्याचा…”, कालीचरण महाराज पुन्हा बरळले

भोपाळ | राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी कालीचरण महाराजने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील धर्म संसदेत कालीचरण महाराजने महात्मा गांधींबद्दल शिवराळ भाषा वापरली होती. तसेच महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांना नमन करतो, असंही कालीचरण महाराजने म्हटलं होतं. त्यातच आता पुन्हा एकदा कालीचरण महाराजने अकलेचे तारे तोडले आहेत.

महात्मा गांधींवर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केल्यानंतर अटक करण्यात आली होती. कालीचरण महाराज तुरूंगातून बाहेर आला असून त्याच्या समर्थकांनी इंदूर विमानतळावर स्वागतही केलं. कालीचरण महाराजला माध्यमांनी आता पश्चाताप होत आहे का? असा प्रश्न केला होता. त्यावर कालीचरण महाराजने प्रत्युत्तर दिलं आहे.

मला कोणताही पश्चाताप होत नाही. या कलियुगात सत्य बोलल्याबद्दल मला शिक्षा होत आहे, असं कालीचरण महाराज म्हणाला आहे. 1 एप्रिलला बिलासपूर न्यायालयाने कालीचरण महाराजला जामीन मंजूर केला आहे. कालीचरण महाराजच्या जामीनाला सरकारी वकिलांनी विरोध केला होता. त्यानंतर देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, कालीचरण महाराजने भरसभेत व्यासपीठावर हे वक्तव्य केलं होतं. या भाषणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक पोलिस स्टेशनमध्ये कालीचरण विरोधात गुन्हेही दाखल झाले होते.

थोडक्यात बातम्या- 

“भाजपची कटुता ही राष्ट्रवादीशी नाही तर शिवसेनेशी”; भाजपच्या नेत्याचं सूचक वक्तव्य

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात इतक्या रुपयांची घसरण

BREAKING | शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट, चर्चांना उधान

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख CBI च्या ताब्यात

राजकीय भुकंप होणार?; देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्त्वाचे संकेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More