Top News

काँग्रेसला मोठा धक्का… ‘या’ नेत्याने दिला राजीनामा; करणार भाजपत प्रवेश

मुंबई | काँग्रेसचे वडाळा मतदारसंघाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज(सोमवार) आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्द केला आहे. ते 31 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

गेल्या साडे चार वर्षात काँग्रेसने माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले नाहीत, त्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची भावना कोळंबकरांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी माझी कामं केली आहेत, त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी आहे. नायगावमधल्या पोलिसांचा प्रश्न सुटला की मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कोळंबकरांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या अटी मान्य केल्याचं बोलंलं जात आहे.

दरम्यान, उद्या(मंगळवार) ते आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-मनसेची ‘ही’ भूमिका आग्रही; पण आम्हाला मान्य नाही- शरद पवार

-“पक्षाला तुमची गरज आहे…पक्ष सोडू नका; उदयनराजेंचं मी बघतो”

-‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आझम खान यांनी मागितली माफी!

-…तर अजित पवारांनीच सर्वात पहिला भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता!

-येडियुरप्पांनी कर्नाटकमध्ये अखेर कमळ फुलवलं; बहुमत परीक्षणात पास

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या