पुणे महाराष्ट्र

काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलोय का?- कल्पनाराजे भोसले

सातारा | काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलोय का? असं वक्तव्य करत आज कल्पनाराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

माझा काटा काढायचा प्रयत्न झाल्यास काट्याने काटा काढू, असा अप्रत्यक्ष इशारा भाजपचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांना दिला होता. त्यावर कल्पनाराजे यांनी शिवेंद्रराजेंना  खडेबोल सुनावले.

गद्दारीचा हा इतिहास तुम्हाला नवा नाही. तरीही तुम्ही काट्याने काटा काढायची भाषा करता? पुन्हा असली भाषा कराल तर येणाऱ्या निवडणुकीत कुणाचा काटा निघेल हे तुम्हाला समजेलच, असंही कल्पनाराजे भोसले म्हणाल्या.

दरम्यान, ज्या शरद पवारांनी आणि त्यांच्या पक्षाने 40 वर्षापेक्षा अधिक काळ तुमच्या वडिलांना आणि तुम्हाला नेतृत्वाची संधी दिली. त्याच पवारांना उतारवयात तुम्ही फसवलं आहे, अशी टीकाही कल्पनाराजे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

-“यांना परिश्रमाने केलेलं काम फक्त उद्ध्वस्त करता येतं”

-‘या’ कारणाने पिचडांच्या पक्षप्रवेशाने भाजपची डोकेदुखी वाढणार???

-विश्वचषकातील पराभवानंतर विराट कोहली म्हणतो…

-‘मनसे’समोर अक्षय कुमारनं घातलं लोटांगण!

-निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांनी दिली शिवसेनेला गोड बातमी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या