बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सर फक्त एवढीच विनंती आहे की…’; कल्पिता पिंगळेंनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ विनंती

मुंबई | ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहयक आयुक्त कल्पिता पिंगळे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत विचारण्यासाठी फोन केला होता. मुख्यमंत्र्यांनी कल्पिता पिंगळे यांच्या धाडसाचं कौतुक केलं. यावेळी बोलताना पिंगळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक विनंती केली आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कल्पिता पिंगळेंचा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून दिला. त्यावेळी, तुमचं कोणत्या शब्दात कौतुुक करावं, मी तुम्हाला शब्द देतो की, तुम्ही बरे झाल्यावर  कारवाई करणार म्हणत आहात पण ती जबाबदारी आता आमच्या सर्वांची असून चिंता करू नका आणि लवकर बरे व्हा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर कल्पिता पिंगळेंनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.

सर माझी इतकीच विनंती आहे की या प्रकरणातील जे गुन्हेगार असतील त्यांना शासन झालं पाहिजे, अशी विनंती पिंगळेंनी मुख्यमंत्र्यांना केली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, ‘तुम्ही त्याची चिंता करू नका, जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होणार आहे फक्त तुम्ही लवकरात लवकर ठणठणीत बऱ्या व्हा’.

दरम्यान, ज्यावेली हल्ला झाला त्याचवेळी का भेटलो नाही याबाबतही मुख्यमंत्र्यांनी पिंगळेंना माहिती दिली. मला रोज रिपोर्ट येत असतो मात्र त्यात राजकारण नको म्हणून भेटणं टाळलं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

काय सांगता! पुण्यात दिवसभर कुठंही फिरा तेही अवघ्या 40 रुपयात

जगावेगळं काम! पुण्यातील नगरसेवकांनी कापडी पिशव्यांवर खर्च केले 11 कोटी

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित; पाहा व्हिडीओ

‘आम्ही त्याला माॅन्टी नावाने…’, सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर मनसे नेत्याची भावुक पोस्ट

ओबीसी आरक्षणावर काँग्रेसची नेमकी भूमिका काय?, नाना पटोले म्हणतात… ; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More