पंढरीच्या ओढीनं निघालं काळवीट, व्हिडिओ व्हायरल

हिंगोली | गजानन महाराज पालखी सोहळ्यात यंदा एक आश्चर्यजनक घडना घडलीय. हिंगोलीत या पालखी सोहळ्यात एक काळवीट घुसलं असून ते पालखीची पाठ सोडायला तयार नाही.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे पालखी जिथे मुक्कामी राहते तिथं हे काळवीट मुक्कामी राहतं. किर्तन, भजन चालू असताना महाराजांच्या पुढं बसतं. तसेच पालखीनं तिचा मुक्काम हलवला की वारकऱ्यांसोबत चालत राहतं.

या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. दरम्यान, वारी पंढरीला पोहोचल्यानंतर परवानगी काढून या काळवीटाला गजानन महाराज संस्थानकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं वारकऱ्यांनी म्हटलंय.

पाहा व्हिडिओ-