Kalyan Crime | कल्याणच्या योगीधाम परिसरात असलेल्या अजमेरा सोसायटीत काल रात्री तूफान राडा झाला. कल्याणच्या खडकपाडा भागात अखिलेश शुक्ला नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख नामक एका मराठी व्यक्तीला बेदम मारहाण केली. योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत ही संतापजनक घटना घडली. या हिंदी भाषिक अधिकाऱ्याने गुंड बोलवून मारहाण केली असल्याचा आरोप समोर येत आहे. या घटनेत जखमी झालेले अभिजित देशमुख यांच्यावर मुंबईतल्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Kalyan Crime)
या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. महाराष्ट्रात एका मराठी माणसाला अशा प्रकारे मारहाण करण्यात आल्याने नागरिक प्रचंड संतापले आहेत. इतकंच नाही तर, अखिलेश शुक्ला नामक या व्यक्तीने मराठी भाषेबद्दल देखील अपशब्द वापरले. तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण, भिकारी आहात. तुमचे मराठीपण बाहेर काढतो, असं म्हणत या व्यक्तीने मराठी भाषिकांना मारहाण केल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहीतीनुसार, सरकारी नोकरी करणारे अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे योगीधाम सोसायटीत शेजारी राहतात. अखिलेश यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. मात्र, याचा धूर वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात जाऊन त्यांच्या तीन वर्षांच्या बाळाला आणि वयोवृद्ध आईला त्रास होत होता. याबाबत वर्षा कळवीकट्टे यांनी अखिलेश यांच्या पत्नी गीता यांना सांगितले. मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्यांच्या बाजूला राहणारे अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघांनी मध्यस्थी केली याचा राग शुक्ला यांना आला आणि त्यांनी काही बाहेरच्या लोकांना बोलवून या दोघांना मारहाण केली.यात मराठी भाषिक अभिजित देशमुख गंभीर जखमी ( Kalyan Crime ) झाले आहेत.
“मराठी माणसं भिकारी आहेत त्यांना मारा”
यानंतर देशमुख यांनी पोलीस तक्रार केली आहे. देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, शुक्ला हे सरकारी नोकरीवर आहेत की नाही ते काय काम करतात त्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी विजय कळवीकट्टे यांनीही प्रतिक्रिया दिली. ते याच सोसायटीत राहतात.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मी माझ्या घरात बसलो होतो. त्यावेळी शुक्ला यांनी अभिजित देशमुख यांची खोली काही माणसांना दाखवली. यानंतर त्यांनी सायकल उचलून दारात आपटली. मी काय झालं बघायला आलो तेव्हा त्यांनी अभिजित देशमुख यांना रॉडने सात ते आठ माणसांनी मारायला ( Kalyan Crime ) सुरुवात केली. इतकंच नाही तर, मराठी माणसं भिकारी आहेत त्यांना मारा असंही ते शिवीगाळ करत म्हणत होते. मी आत गेलो तर मला देखील मारहाण केली. त्यांनी ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे”, असा खुलासा सोसायटीमधील व्यक्तीने केलाय.
News Title : Kalyan Crime govt officer called goons and beating Marathi persons
महत्वाच्या बातम्या –
आज ‘या’ राशींवर असणार स्वामींची विशेष कृपा!
सगळ्यांसमोर अभिषेकने ऐश्वर्यासोबत केलं असं काही…; सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल!
‘इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींवर ‘त्या’ गोष्टींचा दबाव’; सोनाक्षी सिन्हाचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
सरपंच संतोष देशमुख यांचा हादरवून टाकणारा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर!
नव्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी दिली सर्वात मोठी गुड न्यूज!