Top News आरोग्य कोरोना राजकारण

कोरोनाच्या काळात कोणतंही राजकारण करू नका, एकनाथ शिंदेंकडून रामदास आठवलेंना खास सल्ला

मुंबई |केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं गणपती विसर्जनानंतर विसर्जन होईल अशी टीका केली होती. या टिकेला प्रत्युउत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाच्या संकट काळात अशा प्रकारचं राजकारण कोणीही करु नये, सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करु, असा सल्ला रामदास आठवले यांना दिलाय.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले होते की, “पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. तसंच तिन्ही पक्षाच्या अंतर्गत वाद आणि बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचं काही खरे नाही. गणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचं लवकरच विसर्जन होईल.”

कल्याणमध्ये मिशन झिरो कोविड केसेस या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी रामदास आठवले यांना कोरोनाच्या संकटकाळात अशा प्रकारचं राजकारण न करण्याचा सल्ला दिलाय.

त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातील वादासंदर्भात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “पवारसाहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत. सध्या राजकारण महत्वाचं नाही. सध्या सरकारचा फोकस कोविडवर आहे. लोकांचं आरोग्य वाचवणं महत्वाचं आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

पुढच्या 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात हवामान खात्याकडून इशारा, ‘या’ भागात होणार मुसळधार पाऊस

MPSC ची 20 सप्टेंबरची परीक्षा ‘येथे’ होणार, पटोलेंच्या सूचनेची अंमलबजावणी होणार

पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या