Kalyan Loksabha Election | कल्य़ाण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Loksabha Election) चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विरूद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात लढत झाली. मतमोजणीला राज्य भरातच नाहीतर देशात सकाळी 8 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. मात्र कल्याणमध्ये मतमोजणी करत असताना तांत्रिक बिघाडामुळे मतमोजणी खोळंबली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी (Kalyan Loksabha Election) डोंबिवलीच्या क्रीडा संकुलामध्ये मतमोजणीचे आयोजन करण्यात आले. याभागातील वायफाय बंद होते. विजेमुळे सर्व खोळंबा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मतमोजणीसाठी विलंब लागला असल्याचं बोललं जात आहे. यामुळे मतमोजणीची माहिती मिळवण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. मात्र योग्य ती माहिती न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. मतमोजणी कधी सुरू होईल याकडे कल्याणकरांचं लक्ष लागलं आहे.
कल्याणमध्ये आघाडीवर कोण?
कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Loksabha Election) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विरूद्ध ठाकरे गटातून वैशाली दरेकर निवडणुकीच्या रिंगणात होत्या. आजा निकाल आहे मिळालेल्या माहितीनुसार वैशाली दरेकर आणि श्रीकांत शिंदे यांच्यात श्रीकांत शिंदे हे 203 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे विरूद्ध शिंदे प्रतिष्ठेची लढत
कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Loksabha Election) हा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे हे लोकसभा निवडणुकीत पुन्हा खासदार होण्याची चिन्हे आहेत. ही लढत ठाकरे विरूद्ध शिंदे आहे. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची लढत तयार झाली आहे. याचपार्श्वभूमीवर आज नेमकं काय होणार हे लवकरच समजेल.
News title – Kalyan Loksabha Election 2024 News update About Voting Counting Disrupted
महत्त्वाच्या बातम्या
शेअर बाजारात मोठी उलथापालथ; निकालापूर्वीच मार्केट जोरदार आपटलं
बीडमध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ फरकाने बजरंग सोनावणे आघाडीवर
मोठी गुड न्यूज! निकालापूर्वीच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजच्या किंमती
आज शंभर टक्के या राशी गुलाल उधळणार; पाहा कोणाचं नशीब उजळणार
मोठी बातमी! भाजपनं स्वबळावर केला 200 चा आकडा पार