बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडलो म्हणून जर आम्हाला गद्दार ठरवत असतील तर…”

मुंबई | महाविकास आघाडीतून (MVA) आम्ही बाहेर पडलो म्हणून आम्ही गद्दार ठरत नाही. आम्ही शिवसैैनिकच आहोत. आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसेना (Shivsena) संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) डाव होता तो उधळून लावत आम्ही उठाव केला. आम्ही कोणत्याही पक्षात विलीन झालो नाही. आम्हाला फक्त महाविकास आघाडी नको. महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडलो म्हणून जर आम्हाला गद्दार ठरवत असतील तर त्यांनी गद्दाराची व्याख्या स्पष्ट करावी, असं शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) यांनी म्हटलंय. 

कल्याण पश्चिमचे आमदार भोईर हे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारच्या माध्यमातून शहरातील विकासकामे मार्गी लावण्यात येतील असं सांगितलं. शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर हे कल्याण शहराचे शहरप्रमुख आहेत. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्याच्या शहरप्रमुख पदाचं काय?, अशी चर्चा रंगली होती.

भोईर म्हणाले, मी अजून शिवसेनेतच आहे. माझ्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही. शिवसेना प्रमुखांनी माझी शहरप्रमुखपदी नियुक्ती केली होती. त्यांना पसंत असेल तर ते ठेवतील, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, असं भोईर म्हणाले. यावेळी त्यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा देखील उल्लेख करत त्यावरही भाष्य केलं.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देणं हा भूमिपुत्रांचा भावनिक प्रश्न आहे, असं भोईर म्हणाले. नवी मुंबईतील विमानतळाला नाव देण्याचा निर्णय आहे, तो मंत्रीमंडळात होईल. तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. पण तो निर्णय वैध की अवैध हे अजून ठरायचं आहे. त्यामुळे आता त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील, असं त्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या – 

“धर्मवीर आनंद दिघेंवर सिनेमा काढला, तो आवडला नाही, म्हणून…”

“बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांची मला फार काळजी वाटते, त्यांच्या मागे खूप मोठं षडयंत्र”

“मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री राज्याचा भार वाहत असताना राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजतायत का?”

ललित मोदींच्या प्रेमात पडण्यापूर्वी सुष्मिताच्या ‘या’ 10 अफेअर्सचीही रंगली होती खूप चर्चा

मातोश्रीचे पूर्वीचे दिवस गेले म्हणत मनसेची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More