Loading...

पंकजा मुंडेंना मोठा धक्का; या नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश

बीड |  निवडणूक अगदी 8 दिवसांवर आलेली असताना भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे कल्याणराव आखाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

महामंडळाचे अध्यक्षपद न दिल्याने त्यांनी पंकजा मुंडेंची साथ सोडत आता धनंजय मुंडे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणराव आखाडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने बीडची राजकीय समीकरणं बदलू शकतात आणि या बदललेल्या समीकरणाचा भाजपला मोठा फटका बसू शकतो, असं बोललं जात आहे.

Loading...

आचारसंहितेपूर्वी भाजपच्या काही समर्थकांच्या महामंडळावर नियुक्त्या झाल्या मात्र कल्याणराव आखाडे यांना शब्द देऊनही त्यांची नियुक्ती झाली नाही. यामुळेच त्यांनी नाराज होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

कल्याणराव आखाडे यांनी सावता परिषदेच्या माध्यमातून माळी समाजाचं मोठं संघटन आणि मोठं काम केलं आहे. त्यांचा बीडच्या राजकारणात आणि माळी समाजात मोठा दबदबा आहे.  त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पंकजा मुंडेंसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...