Top News देश

“देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय?”

नवी दिल्ली | देशाच्या नवे संसद भवन आता लवकरच उभे राहणार आहे. सुमारे 971 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय?, असा सवाल कमल हासन यांनी मोदींना केला आहे. तामिळनाडूमध्ये येत्या विधानसभेचा निवडणूका पार पाडत आहेत.

2021 मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूकीचा थरार होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात करताना कमल हासन यांनी थेट संसदेच्या मुद्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये चालू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकार  विरोधात राज्याराज्यातून विरोध केला जात आहे. राजधानीमध्ये आंदोलनवरून मोठा गदारोळ चालला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘ही तर ठाकरे सरकारची हुकूमशाही’ म्हणत भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

विजय मल्ल्या कंगाल; वकिलाची फी देण्यासाठीही नाहीत पैसे!

उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात!

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली; रूग्णालयात उपचार सुरु

मुंबई ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम; विदर्भ, कोकणाला पावसाचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या