सक्रीय राजकारणात उतरणार, तामिळनाडूचा मुख्यमंत्रीही होणार!

चेन्नई | मी सक्रीय राजकारणात उतरणार असून , तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनणार आहे, असं वक्तव्य अभिनेते कमल हसन यांनी केलंय. कमल हसन यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.

राजकारणात सक्रीय होत असल्यानं चित्रपटातून संन्यास घेणार अशी चर्चा आहे. परंतु चित्रपटातून संन्यास घेतलेला नाही विश्वरूप-2 आणि इंडियन-2 या चित्रपटांवर काम सुरू आहे. असं स्पष्ट करत त्यांनी चर्चेला पूर्ण विराम दिला.

वाढदिवसानिमित्त कमल हसन मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.