देश

कमल नाथ, दिग्विजय सिंह हे प्रदेशमधील मोठे सर्वात मोठे गद्दार- ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली | काँग्रेस ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि मतदारांचा विश्वासघात करून भ्रष्ट सरकार चालवणारे माजी मुख्यमंत्री कमल नाथ हे मध्य प्रदेशमधील सर्वात मोठे गद्दार असल्याचं भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे.

येत्या 3 नोव्हेंबरला राज्यात पोटनिवडणूक होत असलेल्या 28 जागांपैकी सगळ्या जागा नाही जिंकल्या तरी बहुतांश जागा भाजप जिंकणार असल्याचा विश्वास ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

काँग्रेस पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावर म्हणजे कमल नाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यावर लोकांचा विश्वास नसल्याचं आता स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण पक्षाचे 30 टक्के आमदार पक्ष सोडून गेल्याचं इतर कोणत्याही राज्यात पाहिलं नसेल, असं ज्योतिरादित्य शिंदेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, 28 पैकी 27 जागा यापूर्वी काँग्रेसच्या ताब्यात होत्या. त्यामुळे भाजपकडे जिंकण्यासाठी सर्व काही आहे. तर काँग्रेसकडे सर्व हरण्यासाठीच असल्याचं शिंदे मुलाखतीत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“ब्राह्मणांना भाजपशिवाय पर्यायच नाही, इतर ठिकाणी त्यांना सन्मान मिळत नाही’; भाजप नेत्याचं वक्तव्य

‘पराभव साजरा करायलाही नशीब लागतं’; धनुभाऊंना पंकजाताईंकडून प्रत्युत्तर!

जम्मू-काश्मिरमध्ये जमीन खरेदी करता येणार मात्र अद्यापही ‘या’ जमिनी खरेदी करता येणार नाहीत!

दसरा मेळाव्याचं भाषण होतं की शिमग्याचं- चंद्रकांत पाटील

“सरकारने न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली, आज आमची मागणीही मान्य झाली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या