देश

कमलनाथ हे कोरोनापेक्षाही मोठी समस्या- शिवराज सिंह चौहान

भोपाळ | मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला. अनेक बैठका आणि वाटाघाटीनंतर मंत्रिमडळांचा विस्तार झाला. त्यानंतर भाजपनं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.

भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. कमलनाथ हे मध्य प्रदेशसाठी स्वतःच कोरोनापेक्षा मोठी समस्या आहेत, असा शब्दांत शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली आहे.

कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी कमलनाथ सक्षम होते का? आम्ही या संकटाविरूद्ध चांगली लढाई केली आहे, असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं आहे.

मला कमलनाथ वा दिग्विजय सिंग यांच्याकडून कोणतंही प्रमाणपत्र नकोय. त्यांनी 15 महिन्यांच्या काळात राज्याला लूटलं आहे. त्यांनी सगळ काही स्वतःसाठी केलं. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, टायगर अभी जिंदा है, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

जवानांच्या हातात देश सुरक्षित, जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन, थेट सीमेवर जाऊन मोदींचं संबोधन

कोरोनाविरोधी लढ्यात पुणे महापालिकने टाकला टॉप गिअर, आता….

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अनेकांची नावं समोर आली- अनिल देशमुख

पुण्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी…., अजितदादांनी केली ‘ही’ महत्त्वाची सूचना

कोविडसंदर्भात राज्यात 1 लाख 41 हजार गुन्हे दाखल- अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या