महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

पंकजा मुंडेंच्या फेसबुकवर पुन्हा ‘कमळ’ अवतरलं!

मुंबई | भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यामुळे त्या भाजपला सोडचिठ्ठी देतील अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चांना पंकजा मुंडे यांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे.

पंकजा मुंडे यांनी फेसबुक आणि ट्विटरवरुन कमळाचे चित्र हटवले होते. मात्र त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये पुन्हा एकदा कमळ दिसले आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना आता नवे वळण मिळाल्याचे दिसत आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची आज 136 वी जयंती आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन त्यांना अभिवादन केले आहे. त्यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये कमळ चिन्हाचा पुन्हा एकदा वापर केला आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे 12 डिसेंबर रोजी गोपीनाथगडावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे तसे संकेत दिले होते. त्यामुळे ते काय निर्णय घेतील याबाबत उत्सुकता आहे.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या