बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“2024 च्या निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार”

मुंबई | बॉलिवुडमध्ये नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारा चित्रपट समीक्षक कमाल आर. खानने आता देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. कमाल खानचे ट्विट सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. कमाल खाननचं देशातील 2024 च्या निवडूकीसंदर्भात केललं ट्विट सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

बॉलिवुडपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक मुद्यावर खान बोलत असतो. आता ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान व्हायचं आहे. राहुल गांधी यांनाही पंतप्रधान व्हायचं आहे.  त्याचबरोबर नितीश कुमार यांनाही देखील पंतप्रधान बनायचं आहे. अजून इतरांचीही पंतप्रधान बननण्याची इच्छा आहे. यातून एकच अर्थ निघतो की 2024 मध्ये पुन्हा मोदीजी निवडून येणार आहेत, असं ट्विट आर खानने केलं आहे.

2014 साली जर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेच तर मी भारत सोडून जाईल, असं आर खानने त्यावेळी जाहीर केलं होतं. त्याचबरोबर काही आठवड्यांपूर्वी मोदींना लक्ष्य करत मोदी पब्लिसिटी स्टंट जास्त आणि काम कमी करतात म्हणून मी 2024 च्या निवडणूकीत मोदींना मत देणार नाही, असं ट्विटही खानने केलं होतं. मात्र  आता केलेल्या ट्विटची चर्चा सोशल मीडियावर जास्तच रंगली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर आर खान नेहमी कोणत्याही व्यक्तीबद्दल काहीही बरळत असतो. त्यामुळे नेटकरीही त्याची खिल्ली उडवत असतात. यावर सोशल मीडियावर अनेकांनी समिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर फक्त आर खान नेहमी चेष्टेचा विषय ठरतो, आणि त्यांनी नेहमी अशाच पद्धतीने आमचं मनोरंजन करावं, अशा कमेंट्स ही अनेकांनी केल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

लटकत होतं मुलीचं डोकं अन्…; हलक्या काळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नये!

‘तुम्हाला घंटाच वाजवायची असेल तर…’, संजय राऊतांचा विरोधकांना टोला; पाहा व्हिडीओ

तालिबानला मोठा धक्का! पंजशीरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 350 तालिबान्यांना कंठस्नान

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये 7 कोटींसाठी विचारण्यात आला ‘हा’ प्रश्न; पाहा व्हिडीओ

देवेंद्र फडणवीसांचा राकेश टिकैत यांच्यावर निशाणा, म्हणाले…; पाहा व्हिडीओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More