बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कमाल आर खान अडचणीत, मनोज वाजपेयींकडून खटला दाखल!

मुंबई | बॉलिवुडमध्ये स्वत:ला चित्रपट समीक्षक समजणारा कमाल आर खान बॉलिवुडमधील वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे ट्विट सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.  अलिकडेच त्यांनी बॉलिवुड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मनोज वाजपेयी यांनी आर खानच्या विरोधात इंदूरमध्ये मानहानीचा खटला दाखल केला आहे.

मनोज वाजपेयीची ‘फॅमिली मॅन’ ही वेबसीरीज नुकतीच रीलीज झाली होती. ती चाहत्यांना खुप आवडली. वाजपेयीची ‘फॅमिली मॅन 2’ ही वेबसीरीज ही पहिल्या वेबसीरिजसारखी हिट ठरली. परंतु केआरके म्हणून ओळख जाणारा कमाल आर खानने वाजपेयीच्या फॅमिली मॅनच्या सीरिजवर निशाणा साधला.

केआरकेने मनोज वाजपेयींच्या विरोधात 26 जूलैला एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी फॅमिली मॅन 2 ही वेबसीरिज पार्नला प्रोत्साहन देणारी असल्याचं म्हटलं होतं. तसेच मी फालतू नाही म्हणून वेबसीरिज मी पाहत नाही, तुम्हाला गंजेडी मनोज का आवडतो, असंही मनोज वायपेयीला केआरकेने म्हटलं होतं.

वाजपेयींनी केआरकेविरूद्ध न्यायालयात आयपीसीच्या कलम 500 नुसार बदनामीविरूद्ध शिक्षा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 सप्टेंबरला न्यायालय होणार आहे. याआधी सलमान खाननं देखील केआरकेविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनी सलमान खानच्या बीइंग ह्युमन या कंपनीच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

पवार साहेब याला मुख्यमंत्री केला, याचा सुसंस्कृतपणा बघा- नारायण राणे

‘…म्हणून मी ते वक्तव्य केलं’; वादग्रस्त वक्तव्यावर नारायण राणेंचं स्पष्टीकरण

संजय राऊतांची नवी फेसबुक पोस्ट, सोशल मीडियावर जोरदार राडा!

अनिल परबांवर गुन्हा दाखल करा, भाजपची रत्नागिरी पोलीस अधीक्षकांकडे मागणी!

नारायण राणेंच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More