बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान मोदींचा मुत्सद्दीपणा! कमला हॅरिस यांना दिलं ‘हे’ खास गिफ्ट

वॉशिंग्टन | पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बदलल्यानंतर नरेंद्र मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. या दौऱ्यात नरेंद्र मोदी क्वाड समुहाशी संवाद साधणार आहेत. त्याआधी भारतीय वंशाच्या अमेरिकन महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. त्यावेळी पंतप्रधानांनी कमला हॅरिष यांना खास भेटवस्तू दिली आहे.

अमेरिकेच्या या दौऱ्यात नरेंद्र मोदी अनेक नेत्यांची भेटीगाठी घेताना दिसत आहेत. त्यावेळी पंतप्रधानांनी अनेक नेत्यांना भेटवस्तू देताना दिसत आहेत. मात्र, पंतप्रधान मोदींनी दिलेल्या भेटवस्तूने कमला हॅरिस यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. कमला हॅरिस यांना त्यांचे आजोबा श्री.पी.व्ही. गोपालन यांच्याविषयीच्या जुन्या माहितीच्या प्रती भेट दिल्या आहेत. श्री.पी.व्ही.गोपालन भारत सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी होते. तसेच त्यांनी अनेक पदांवर काम केलं आहे. श्री.पी.व्ही.गोपालन यांना भारत सरकारकडून सन्मानित देखील करण्यात आलं होतं. त्याच्या काही प्रती यावेळी मोदींनी दिल्या आहेत.

कमला हॅरिस यांना गुलाबी मीनाकारी असलेला बुध्दीबळाचा सेट भेट दिला आहे. हा सेट पुर्णत: हातांनी बनवलेला आहे. हा सेट काशीची उत्कृष्ट कलाकृती दर्शवतो. यामध्ये प्रत्येक मोहरा लहान दिसत आहे. त्यामुळे हा खास बुध्दीबळाचा सेट नरेंद्र मोदींनी कमला हॅरिस यांच्यासाठी मागवला होता.

दरम्यान, अमेरिका दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण चर्चा होत आहेत. कमला हॅरिष यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधानांनी पाकिस्तानातील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच भारताची मदत केल्याबद्दल अमेरिकेचे आभार देखील मानले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“तिला 52 दिवस तुरूंगात ठेवलं, आता राऊतांनी महिला सन्मानाच्या गोष्टी करूच नयेत”

”महाराष्ट्रातील सर्व कामांची यादी द्या, लागतील तेवढे रोप-वे, रस्ते, पूल बांधून देईन”

‘गडकरी साहेबांचा फोन आला, अजित जरा लवकर ये…’; अजित पवारांनी सांगितला किस्सा

”हिंदू खतरे में है, हा तर भाजपचा जुमला, आता भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करावेत”

राज्यात पावसाचा धोका वाढला; ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More