Top News

अमेरिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या महिलेला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी

वॉशिंग्टन | कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. कमला हॅरिस भारतीय वंशाच्या असून याआधी अमेरिकेत केवळ दोनवेळा महिलांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली होती.

डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बिडेन यांनी कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली. मला अभिमान आहे की देशाच्या सर्वोत्तम जनसेवकांपैकी एक निर्भिड कमला हॅरिस यांना मी माझा सहकारी म्हणून निवडलं आहे. अमेरिकेच्या या निवडणुकीत त्या माझ्या सहकारी म्हणून सहभागी होतील, असं जो बिडेन म्हणाले.

जो बिडेन यांना कमांडर इन चीफ बनवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल. बिडेन अमेरिकेच्या नागरिकांना एक करु शकतात. त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य आमच्यासाठी संघर्ष करण्यात घालवलं आहे. मला या पदाच्या उमेदवार म्हणून निवडले गेले याचा मला अभिमान आहे, असं कमला हॅरिस म्हणाल्या आहेत.

दरम्यान, अमेरिकेच्या निवडणूक इतिहासात आतापर्यंत एकही महिला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकू शकलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-

‘आता जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल’, चंद्रकांत पाटील यांचा नितीन राऊत यांना इशारा

मराठा आरक्षण लढ्यात बलिदान दिलेल्या सदस्यांच्या कुटुंबासाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा!

“महापौर साहेब इंग्रज होऊ नका, गणेश विसर्जन घाटावरच करणार”

शरद पवार आमचे कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना देण्याचा त्यांना अधिकार- जयंत पाटील

पार्थला फटकारल्यानंतर अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या