बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

16 मार्चला ठरणार कमलनाथ सरकारचं भवितव्य

भोपाळ | आमदारांनी बंडखोरी करून राजीनामे दिल्याने मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार अडचणीत आलं आहे. दरम्यान राज्याचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला 16 मार्च रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवारी 16 मार्च रोजी कमलनाथ यांच्या सरकारचे भवितव्य निश्चित होणार आहे.

दरम्यान 16 मार्चपासूनच मध्य प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश काँग्रेसने आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा सोडचिठ्ठी दिल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. शिंदेंचे समर्थक असलेल्या अनेक मंत्री आणि आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील कमलनाथ सरकार अडचणीत आलं आहे. तर भाजपकडे पुन्हा एकदा मध्य प्रदेशची सत्ता हस्तगत करण्याची संधी चालून आली आहे.

16 मार्चपासून सुरू होणार असलेल्या मध्यप्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी राज्य काँग्रेसने आपल्या आमदारांसाठी शनिवारी व्हीप जारी केला. विधानसभेत रोज उपस्थित राहून मतदान घेण्याची स्थिती उद्भवल्यास सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा आदेश आमदारांना देण्यात आला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार”

“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता शहरातले मॉल्स देखील बंद राहणार!

‘चासकमान’साठी भूसंपादन चुकीच्या पद्धतीने; पवारांची पुनर्वसनमंत्र्यांशी चर्चा

#CoronaVirus : षटकार तर मारला आता चेंडू कोण शोधणार? 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More