Top News महाराष्ट्र

शिवरायांचा पुतळा हटवला तिथंच आता स्मारक; मुख्यमंत्री कमलनाथ करणार भूमिपूजन

Loading...

मुंबई | मध्य प्रदेशमधल्या छिंदवाडामध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेत छ. शिवाजी महाराजांचा पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवण्यात आला होता. यानंतर संपुर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी याचा निषेध नोंदवला. यावर महाराजांचा पुतळा ज्या जागेवरून हलवण्यात आला होता त्याच जागेवर महाराजांचं स्मारक उभारून विधीवत स्थापना होणार आहे. या स्थापनेवेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हजर राहणार असल्याचं काँग्रेस नेते सुनील केदार यांनी सांगितलं आहे.

अतिक्रमणाची कारवाई करताना अधिकाऱ्यांनी महापुरूषाच्या सन्मानाला तडा जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबत चौकशी होणार असल्याचंही केदार यांनी सांगितलं आहे.

Loading...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं. मध्यप्रदेशा मधिल काँग्रेस सरकारने व पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा, अशी मागणी संभाजी राजेंनी केली.

दरम्यान, भाजपच्या नेत्यांनीही या प्रकरणावरून राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षावर जोरदार टीका केली.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

आमचे पूर्वज हिंदूच होते मग आम्ही नागरिकत्वाचा दाखला का द्यावा?- सय्यदभाई

आळशी सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा कशाला?- राजू शेट्टी

महत्वाच्या बातम्या-

Loading...

पेस्ट कंट्रोलनंतर खबरदारी न घेणं जिवावर बेतलं; पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू

“उद्धवजी, राष्ट्रपुरूषांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा”

छत्रपतींचा वंशज म्हणून असलं क्रूर कृत्य कदापी सहन करणार नाही- संभाजी राजे

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या