मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं ‘कमल’ फुलणार; कमलनाथांच्या नावावर शिक्कामोर्तब?

भोपाळ | मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या नावावर आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. याबाबत अंतिम निर्णय राहुल गांधी यांच्याशी बोलणी झाल्यानंतर घेण्यात आला.

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाची चर्चा होती, अखेर कमलनाथ यांनी बाजी मारली आहे.

कमलनाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे काँग्रेसचे 114 आणि इतर 7 अशा 121 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातील छिंदवाडा लोकसभा मतदार संघाचं कमलनाथ प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी केंद्र सरकारमध्ये विविध मंत्रिपद भूषवली आहेत.

महत्वाच्या बातम्या 

-राहुल गांधीना पप्पू म्हणण्यापूर्वी आता किमान 10 वेळा विचार करा!

-खरं खरं सांगा, खरा फेकू कोण??? शत्रुघ्न सिन्हांचा सवाल

-पंतप्रधान नरेंद्र मोदींची खुर्ची धोक्यात; योगी आदित्यनाथांना पंतप्रधान करण्याची मागणी

-कोण होणार मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री?; आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेसची खलबतं

-कतरिना कैफचा हॉट अंदाज; झिरो सिनेमातील ‘हुस्न परचम’वर प्रेक्षकांच्या उड्या