बंगळूरच्या ‘या’ आज्जी ठरल्या कोरोनाची लस घेतलेल्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती
मुंबई | कोरोना व्हायरसवरील जगभरातील सर्वात मोठं लसीकरण सध्या भारतात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत अनेक मंत्री, नेते, आरोग्य आणि प्रशासकीय कर्मचार्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला आहे. मात्र बंगळूरमध्ये चक्क 103 वर्षीय आज्जींनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनाची लस घेतलेल्या भारतातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून त्यांची नवी ओळख झाली आहे.
बंगळूरमधील कामेश्वरी या 103 वर्षांच्या असून बनेरघट्टा येथील अपोलो रूग्णालयात त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. कामेश्वरी यांच्या पुढाकारानं आता वयोवृद्ध नागरिकांनाही लस घेण्यासाठी बळ मिळणार आहे. कोरोनाचा देशातील आकडा दिवसागणिक वाढत असताना लसीकरण मोहिमेमुळे मात्र रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत वाढ झाल्याची दिसून येत आहे.
कोरोनाची लस सुरक्षित असून नागरिकांनी लस घेण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवावा यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीतील एम्स रूग्णालयात जाऊन लस घेतली. आपण देशाला कोरोनामुक्त करू असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी यावेळेस व्यक्त केला. मात्र मोदींनी लसीकरणाच्या वेळेस काढलेल्या फोटोत मास्क न वापरल्याने सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं होतं.
दरम्यान लॉकडाऊन उठल्यानंतर आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात झपाटयानं वाढ झाली आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पुणे- मुंबईसारख्या शहरात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनमध्ये आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अशा प्रकारचं अंशत: लॉकडाऊन राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय घोषित केला आहे.
थोडक्यात बातम्या –
मराठा समाजाला आरक्षण तरी द्या, अथवा आम्हाला विष पिऊन मरु द्या- उदयनराजे भोसले
“सचिन वाझे उत्तम तपास अधिकारी, विरोधकांनी राजीनामा अन् बदल्यांमध्ये रमू नये”
राखी सावंतचा नागीन अंदाज पाहिलात; पाहा व्हिडीओ
भाजपने चार वर्षापुर्वी तिकीट कापलेले तीरथ सिंह उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री!
…म्हणून शिवराज सिंह चौहानांना ‘पावरी हो रही है’ चा मोह आवरला नाही
Comments are closed.