मनसेच्या तक्रारीकडं लक्ष दिलं असतं तर 13 जीव वाचले असते!

मुंबई | कमला मिल कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय. मात्र मनसे कार्यकर्त्यानं केलेल्या तक्रारीकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित या 13 जणांचे प्राण गेले नसते. 

मनसे कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी 10 ऑक्टोबर रोजीच कमला मिलसंदर्भात मुंबई महापालिकेकडे तक्रार केली होती. मात्र पालिकेने या तक्रारीला गांभीर्याने घेतलं नाही. कमला मिलमध्ये कुठल्याही अवैध गोष्टी नाहीत, असं उत्तर त्यांना देण्यात आलं होतं. 

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणामुळेच अनेकांना जीव गमवावा लागला का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.