Top News देश

मुख्यमंत्र्यांचा मुलगा स्वखर्चाने उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा

भोपाळ |  मध्य प्रदेशमधील छिंदवाडा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्याचे पडसाद मध्यप्रदेशसह महाराष्ट्रात उमटले होते. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पुतळा सन्मानपूर्वक बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

कमलनाथ यांचे पुत्र आणि खासदार नकुलनाथ यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे त्याची स्थापना करणे यासाठी जो काही खर्च येईल तो स्वखर्चातून करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे.

महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर कमलनाथ सरकारवर जोरदार टीका झाली होती. भाजपने काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले होते. मात्र, मध्य प्रदेश सरकारला दोन-तीन दिवसांपासून शिवप्रेमींमध्ये असणारा राग शांत करण्यास यश आलं आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या एका शहरात वाहतुकीस अडथळा ठरतो या कारणाने शिवरायांचा अर्धपुतळा असलेला चौथरा हटवण्यात आला होता. त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते.

ट्रेंडिंग बातम्या-

‘मी शपथ घेते की प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही’; ‘व्हॅलेंटाईन डे’ला विद्यार्थिनींचा निर्धार

शिवरायांवरचा हा टिकटाॅक व्हीडिओ सोशल मीडियात तुफान लोकप्रिय!

महत्वाच्या बातम्या-

भारत भेटीला येणाऱ्या ट्रम्पंना झोपडपट्टी दिसू नये म्हणून उभी राहतीये भिंत

पवारांवर पीएचडी करणं ये आपके बस का काम नही है- रूपाली चाकणकर

#ValentinesDay2020; रोहित पवारांची मोदी सरकारला कोपरखळी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या