Casting couch | बॉलीवुडमध्ये कास्टिंग काऊचचे अनेक प्रकार घडले आहेत. अनेक मोठ्या अभिनेत्रींनी याबाबत अनेकदा खुलासा देखील केलाय. अशात छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मात्र, एक वेगळाच दावा केलाय.अभिनेत्री काम्या पंजाबीने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये टीव्ही आणि मालिका क्षेत्र हे काम करण्यासाठी सर्वात सुरक्षित क्षेत्र असल्याचा दावा केला आहे. (Casting couch)
टीव्ही आणि मालिका या क्षेत्रात लैंगिक अत्याचार किंवा कास्टींग काऊचसारखे प्रकार होत नसल्याचं अभिनेत्री म्हटलंय. टीव्ही इंडस्ट्री फार सुरक्षित असून, पूर्वी काय व्हायचं याबाबत मला जास्त माहीत नाही, असं काम्या पंजाबी म्हणाली आहे.
टीव्ही इंडस्ट्री महिलांसाठी सर्वात सुरक्षित
अनेक बड्या अभिनेत्रींनी काम मिळवण्यासाठी कॉम्प्रमाइज करावं लागतं, असं मत यापूर्वी मांडलं आहे. मात्र, टीव्ही क्षेत्रात असं काहीही होत नसल्याचं काव्या पंजाबीने म्हटलं आहे. “तुम्ही भूमिकेसाठी योग्य ठरत असाल आणि तुमच्यात कौशल्य असेल तर तुम्हाला मालिकेसाठी निवडलं जातं. मला वाटतं की, टीव्ही मालिका क्षेत्र हे सर्वात सुरक्षित क्षेत्र आहे. इथे सर्वकाही एकमेकांच्या सहमतीने होतं. कुणाला भूमिका देतो म्हणून झोपायला संगत नाहीत.”, असं मत काम्याने मांडलं.
त्याचबरोबर काही कलाकार हे महिलांच्या मागे लागत असतात, असंही तिने सांगितलं. “तुम्हाला हात लावला जाईल आणि तुम्ही अनकम्पर्टेबल व्हाल असं इथे होत नाही. तुम्ही असं झाल्यास लगेच आणि थेट ‘हे मला पटत नाही’ असं सांगितलं तर तुम्हाला कोणी स्पर्शही करत नाही.”, असं काम्या म्हणाली. (Casting couch)
अभिनेत्री काम्या पंजाबीने केला मोठा खुलासा
“आम्ही मुलींच्या मागे वेडे झालेले अभिनेते देखील बघितले आहेत. पण, कुणीही कुणावर बळजबरी करत नाही.जर मुलीची इच्छा नसेल तर तसलं काही होत नाही. किमान टीव्ही मनोरंजन क्षेत्रात तरी हे होत नाही. बाकी चित्रपट आणि ओटीटीबद्दल मला जास्त माहीत नाही.”, असं काम्याने सांगितलं.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री काम्या पंजाबीने छोट्या पडद्यावर आपल्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली आहेत. तिने ‘बनू मे तेरी दुल्हन,’ ‘परवरीश – कुछ खट्टी कुछ मिठी’ आणि ‘मर्यादा : लेकीन कब तक’ यासारख्या मालिकांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. बिग बॉसच्या सातव्या सीजनमध्ये देखील काम्या सहभागी झाली होती. (Casting couch)
News Title- Kamya Punjabi Big Disclosure About Casting Couch
महत्त्वाच्या बातम्या –
1 ऑक्टोबरपासून होणार मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम?
‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ यांची चिंता करू नये; भाजप नेत्याचा पलटवार
‘मुंबई’ पुन्हा टार्गेट ? दहशतवादी हल्ल्याचा कट
लग्नाच्या काही महिन्यातच सोनाक्षी नवऱ्याला त्रासली?, धक्कादायक खुलासा समोर