मनोरंजन

‘…यासाठीही हिरोसोबत झोपावं लागतं’; कंगणाचा पुन्हा जया बच्चन यांच्यावर निशाणा

नवी दिल्ली | समाजवादी पार्टीच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी राज्यसभेत बोलताना, ‘जिस थाली मे खाते है, उसी में छेद करते है’ असं म्हणत त्यांनी रवि किशन यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. त्यानंतर जया बच्चन यांनी बॉलिवूड इंडस्ट्रील गटार म्हणणाऱ्या कंगणालाही फटकारलं होतं. यावर कंगणानेही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. अशातच पुन्हा एकदा कंगणाने जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.

जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीनं काय काम दिलं आहे. एक काम दिलं होतं ज्यामध्ये दोन मिनिटाचं आयटम नंबर आणि एक रोमॅंन्टीक सीन मिळत होता. तेही हिरोसोबत झोपावं लागल्यानंतर, असं कंगणाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मी इंडस्ट्रीला स्त्रीवाद शिकवलाय. माझी थाली स्वत: देशभक्ती आणि महिलाप्रधान चित्रपटांनी सजवली आहे. त्यामुळं ही माझी थाळी आहे, जयाजी तुमची नाही, असंही कंगणाने म्हटलं आहे. यासंदर्भात तिने ट्विट केलं आहे. याआधीही कंगणनाने त्यांच्यावर टीका केली होती.

दरम्यान, कंगणा आणि शिवसेनेचा आता कुठे वाद शांत झाला नाहीतर कंगणा आणि जया बच्चन यांच्यात वाकयुद्ध सुरू होणार असल्याचं दिसत आहे. कंगणाच्या या प्रतिक्रियेनंतर जया बच्चन काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

मराठा समाज आक्रमक!आजपासून कोल्हापूरमधूम मुंबई, पुण्याला दुध पुरवठा बंद

दिवाळीच्या मुहूर्तावर फुटणार अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’

कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा- सदाभाऊ खोत

सुशांत आणि दिशा मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांचं अमित शहांना पत्र, म्हणाले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या