Top News देश

“कृषी कायदा समजून घेणारे आणि कायद्याला पाठिंबा देणारे हेच खरे देशभक्त आहेत”

नवी दिल्ली | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत सध्या आपल्या कोणत्या कोणत्या वक्ताव्याने चर्चेत असते. कधी कधी तिला आपल्या या वक्तव्यांमुळे टीकेचा सामना करावा लागतो. मात्र कंगणा आपली मत बिंधास्तपणे मांडत असते. अशातच कंगणाने पुन्हा एक ट्विट केलं आहे.

अखंड भारतावर प्रेम करणारे, भारत देशाचे तुकडे होऊ नयेत असं वाटणारे… अशा लोकांना सुप्रभात! कृषी कायदा समजून घेणारे आणि या कायद्याला पाठिंबा देणारे हेच खरे देशभक्त आहेत आणि शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत. त्यामुळे ढगांपासून सावध रहा, असं कंगणाने म्हटलं आहे.

कंगणाने कृषी कायद्याला पाठींबा देणाऱ्यांना खरे देशभक्त असल्याचं म्हटल्यामुळ कंगणावर मोठ्या प्रमाणात टीका होण्याची शक्यता आहे. कंगणाच्या ट्विटला नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे मात्र काहींनी टीकाही केली आहे.

देशभरातून शेतकऱ्यांनी केंद्राच्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवला आहे. शेतकरी काही मागे हटायला तयार नाही. त्यामुळे अनेक बैठका सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झाल्या मात्र या बैठकीत काही तोडगा निघाला नाही.

 

थोडक्यात बातम्या-

शिवसेनेचा ‘परळ ब्रँड’ पाच वेळा खासदार राहिलेले मोहन रावले याचं निधन

आता शिक्षकांनाही कोविड उपचारावरील खर्च मिळणार!

क्रूरतेचा कळस! रात्रीच्या अंधारात बैलाला गळफास देऊन बैलाची केली हत्या

पुत्र मोह सोडा, लोकशाहीला वाचवा- शिवानंद तिवारी

“अजित पवारांना जे काही मिळालंय ते शरद पवारांमुळे त्यावर त्यांनी स्वत:च लेबल लावू नये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या