मनोरंजन

‘उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही तर सॉफ्ट पॉर्नसाठी प्रसिद्ध’; कंगणाने उधळली मुक्ताफळं

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत तिच्यावर टीका करणाऱ्या प्रत्येकाला ती उटलून प्रतिक्रिया देत आहे. अशातच तिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली आहे. टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगणा बोलत होती.

माझ्या संघर्षांची थट्टा करणं आणि मी तिकीटासाठी भाजपला खूष करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा आधारावर माझ्यावर हल्ला करणे. खरंतर मला तिकीट मिळणं फारसं कठीण नाही. उर्मिला देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की ते अत्यंत निंदनीय आहे. पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते?, सॉफ्ट पॉर्नसाठी ना?, असं कंगणाने म्हटलं आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी एबीपी माझाच्या कट्यावर दिलेल्या मुलाखतीत कंगणाला देण्यात आलेल्या वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेवरून आणि मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून मातोंडकर यांनी कंगणाला फटकारलं होतं.

दरम्यान, कंगणाने केलेल्या खालच्या पातळीच्या टीकेमुळे तिच्यावरच मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा, अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी उर्मिला मातोंडकर यांना पाठिंबा दर्शवला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील युवा अभिनेत्याचं निधन

“कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्येत रोखू शकेल”

‘सुशांतच्या फार्महाऊसवर रियाच्या आधी येत होती ही अभिनेत्री’; फार्महाऊस मॅनेजरचा धक्कादायक खुलासा

…म्हणून 10 सरकारी पाठशाला कायमस्वरूपी बंद; शालेय शिक्षण विभागाच निर्णय

‘…यासाठीही हिरोसोबत झोपावं लागतं’; कंगणाचा पुन्हा जया बच्चन यांच्यावर निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या