महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही – कंगणा राणावत

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यातील भाषणात अभिनेत्री कंगणा राणावतवर नाव न घेता टीका केली होती. या टीकेला कंगणाने व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे सत्ता येते आणि जाते, पण एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही. तुम्ही फक्त सरकारी सेवक आहात. महाराष्ट्राची जनता तुमच्यावर खूश नाही, अशा शब्दात कंगणा राणावतने उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय.

उद्धव ठाकरे तुम्ही मला भाषणात शिवी दिली. याआधीदेखील सोनिया सेनेच्या अनेक लोकांनी मला धमक्या, शिव्या दिल्या आहेत. या लोकांनी मला मारण्याचीदेखील धमकी दिली आहे. पण आता नारीशक्तीचे जे ठेकेदार आहेत ते काहीच बोलणार नाहीत, असं कंगणाने म्हटलंय.

मुंबईत आझाद कश्मीरच्या घोषणा झाल्या होत्या. तेव्हा तुमच्या सोनिया सेनेने या घोषणा देणाऱ्यांचा बचाव केला. त्यामुळे मी मुंबई पाकव्याप्त काश्मीर असल्याचं बोलले होते. त्यावेळी तुम्ही माझ्यावर खूप नाराज झाले होते. चांगले कायदेपंडीत माझ्याविरोधात उभे राहिले होते, असा दावा कंगणाने केलाय.

महत्वाच्या बातम्या-

“नारायण राणेंची वैद्यकीय तपासणी करायला हवी”

काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठी बीडमध्ये येऊन गेले- धनंजय मुंडे

“थाळ्या नाही वाजवायच्या तर घरात बसून अंडी उबवायची?”

‘कुणीही कितीही टरटर केली तरी…’; नवाब मलिकांचा भाजपला टोला

ना जीडीपी कळतो, ना अर्थव्यवस्था, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या