‘उर्फीच्या वेशभूषेवर आक्षेप तर मग कंगना-अमृता फडणवीस…’, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना सवाल

मुंबई| उर्फी जावेद(Urfi Javed) तिच्या कपड्याच्या फॅशनमुळं नेहमीच चर्चेत असते. नेटकरी तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोलही करत असतात. त्यातच भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी उर्फीच्या कपड्यांमुळं तिला बेड्या ठोकण्याची मागणी केली होती.

चित्रा वाघ यांना प्रत्त्युत्तर देताना उर्फी म्हणाली होती की, माझ्या विषयावरून जनतेला भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय. यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ यांचा वाद चांगलाच चर्चेत आला होता.

आता या सगळ्या वादात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी उडी टाकली आहे. अंधारेंनी कंगना रनौत(Kangana Ranout), केतकी चितळे(Ketki Chitale), अमृता फडणवीस(Amrita Fadnvis) यांचे फोटो फेसबूकवर शेअर करत चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

अंधारेंनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, अंग प्रदर्शन करणं चुक की बरोबर यावर नंतर कधीतरी बोलूया. परंतु पेहराव हा मुद्दा घेऊन जर एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म आणि विचारधारा बघून का करावी, असा सवाल अधारेंनी उपस्थित केला आहे.

जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर तेच आक्षेप तुम्ही कंगना रनौत, केतकी चितळे आणि अमृता फडणवीस यांच्यावर घेऊ शकाल का ?, किंवा त्यांना मारहाणीची भाषा कराल का, असंही अंधारे या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात,चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिक जीवनाशैलीशी निगडीत प्रश्न सोडून किती भरकटत जाल, असा टोलाही अंधारेंनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More