बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाजुद्दिन सिद्दीकीचा फोटो शेअर करत कंगना म्हणाली ‘मला वाघ मिळालाय’

मुंबई | बाॅलिवूडची पंगा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य, बेधडक बोलणं, यामुळे चर्चेचा विषय बनत असते. यातच कंगना आता एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे.

कंगना रणौतने ‘मानिकार्निका’ चित्रपटाच्या बॅनरखाली आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतीच या चित्रपटासंबंधी नवी माहिती समोर आली आहे. कंगनाच्या या चित्रपटात वेगवेगळ्या वेबसिरीजमधून झळकलेला अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी पहायला मिळणार आहे. त्यामुळे कंगना आणि नवाजुद्दिन सिद्दिकीची नवी जुगलबंदी सिनेप्रेमींना बघता येणार आहे.

कंगना रणौतने या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ‘आमच्या टिकू वेडस शेरूच्या टीममध्ये या पिढीतील एका सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा समावेश झाला आहे. आम्हाला आमचा वाघ मिळाला आहे, त्यामुळे आम्हाला खुपचं अभिमान वाटतं आहे’, अशी पोस्ट कंगनाने लिहली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या नावाची चर्चा होती. नवाजुद्दिन सिद्दिकीने याआधी प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत काम केलं आहे.

दरम्यान, कंगना रणौत लवकरच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. ती इंदिरा गांधी यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. अलीकडेच या चित्रपटाविषयी बोलताना कंगनाने सांगितलं की, ती लवकरच इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार आहे. पण हा चित्रपट त्यांचा बायोपिक असणार नाही, हा एक ग्रँड पीरियड ड्रामा चित्रपट असेल. यामध्ये राजकारणाबद्दल बराच ड्रामा असेल.

थोडक्यात बातम्या-

“चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

अनिल देशमुख यांच्यानंतर आता सुपुत्र ‘सलिल देशमुख’ ईडीच्या रडारवर?

“लक्षात ठेवा, आम्हाला डिवचल्यास बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही”

पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना बारणेंचं निधन

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More