Top News देश

“कंगणाला दिवसातून एकदा माझं नाव घेतल्याशिवाय जेवण पचत नाही”

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून देशात वातावरण पेटलेलं आहे. यामध्ये शेतकरी आंदोलनातील एका वृद्ध आजीबद्दल कंगणाने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून दिलजीत दोसांज आणि कंगणाचं सोशल मीडियावर ट्विटर वार रंगलं आहे. अशातच दिलजीतने पुन्हा एकदा कंगणावर निशाणा साधाल आहे.

कंगणाला दिवसातून एकदा माझं नाव घेतल्याशिवाय जेवण पचत नाही. माझं नाव म्हणजे डॉक्टरच्या औषधासारखी असल्याचं दिलजीतने म्हटलं आहे. याबाबत त्याने ट्विट केलं असून कंगणाच्या आवाजाची मिमिक्री केली.

दिलजीतने हा ऑडिओ शेअर केल्यानंतर काही वेळातच कंगणाने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कंगणा रााणावतने थेट दिलजीत दोसांज आणि प्रियांका चोप्राचं नाव घेत म्हणत आहे की, त्यांनी शेतकऱ्यांना भडकवलं असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, कंगणाने आजही सकाळी जे कृषी कायद्याला समर्थन देतील ते खरे देशभक्त असल्याचं म्हटलं आहे. यावरून नेटकऱ्यांनी कंगणावर निशाणा साधला.

 

 

थोडक्यात बातम्या-

“शिवसेना हा अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष”

रतन टाटा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गौरवोद्गार; म्हणाले…

धक्कादायक! सावत्र आईने चिमुकल्याला गरम तव्यावर उभं करत दिले चटके

ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत- सुवेंदू अधिकारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या