Top News महाराष्ट्र मुंबई

मुंबई महापालिकेला खिसा करावा लागणार खाली?; नुकसान भरपाई म्हणून कंगणाने मागितले इतके कोटी

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत आणि शिवसेनेतील संघर्ष चांगलाच पेटला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कंगणा राणावतच्या कार्यालयावर कारवाई केली होती. यावर कंगणाने मुंबई महापालिकेकडे नुकसान भरपाई म्हणून कोटींमध्ये रक्कम मागितली आहे.

कंगनाने महापालिकेच्या कारवाईविरोधात याआधी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करत महापालिकेला 2 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही तिने आता केली आहे.

कंगणाने बंगल्याच्या एकूण मालमत्तेपैकी 40 टक्के नुकसान झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणावर पुढील आठवडयात मुंबई उच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला जर कंगणाचं बांधकाम अनाधिकृत असल्याचं सिद्ध नाही करू शकली तर महापालिकेला नुकसान भरपाई देण्यासाठी आपल्या खिशातील 2 कोटी रूपये द्यावे लागणार आहेत.

दरम्यान, कंगणा राणावत मुंबई सोडली असून मनालीला गेली आहे. कंगणाला तिकडे 15 दिवस क्वारंटाईन केलं आहे. मात्र कंगणाला हिमाचल प्रदेशच्या सरकारने दिलेली सुरक्षा तरीही चालूच राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मी जाहीर करतो की आजपासून मी भाजप-आरएसएस सोबत आहे- मदन शर्मा

आग्र्यातल्या याच दरबारातील अपमानाचा बदला घेवून महाराजांनी…’; उदयनराजेंनी मानले आदित्यनाथ यांचे आभार

ड्रग माफियांची माहिती न देताच ड्रामा क्वीन का परत गेली?”

विधी’च्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचं पुनर्विलोकन करा- सुनील गव्हाणे

अचानक अभिषेक फासावर लटकल्याचा दिसला तर…’; कंगणा राणावतचं जया बच्चन यांना प्रत्युत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या