बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जावेद अख्तर यांनी शिवसेनेच्या दबावाखाली…; कंगनाचा शिवसेनेवर गंभीर आरोप

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने केलेल्या एका वक्तव्यामुळे बाॅलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. जावेद अख्तर यांनी मला घरी बोलावून ह्रतिक रोशन आणि त्याच्या कुटुंबांची माफी मागण्याची धमकी दिली असल्याचं कंगनाने मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर आता हे प्रकरण न्यायालयात पोहचलं आहे.

जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध खोटी वक्तव्ये करून आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला होता. तर सुशांतसिंग प्रकरणात देखील कंगनाने विनाकारण नाव घेतल्याचं देखील जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला होता.

आता या प्रकरणाची सुनावणी 1 ऑक्टोबरपर्यंत पुढं ढकलण्यात आली आहे. त्यावर कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. जावेद अख्तर यांनी शिवसेनेच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला आहे. मी एक योद्धा आहे, मी माझ्या स्वत:च्या शैलीत संपूर्ण सैन्याचा सामना करू शकते, असंही कंगनाने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या सुनावणीवेळी कंगना न्यायालयात हजर झाली नाही. आजारी असल्याने न्यायालयाने कंगनाला सुट दिली होती. मात्र, पुढील सुनावणीवेळी कंगना हजर राहिली नाही तर तिला अटक केली जाईल, असंही न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून प्रसिद्ध अभिनेता विजयने आई-वडिलांवर केले गंभीर आरोप, जाणून घ्या प्रकरण!

“ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग केला जातोय, मात्र कर नाही त्याला डर कशाला”

चिमुकलीला पाण्यात बुडताना पाहून कुत्र्याने…; व्हिडीओ व्हायरल

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

चंद्रकांत पाटील म्हणजे महाराष्ट्राला पटलेलं गोड स्वप्न- रूपाली चाकणकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More