बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटावर कंगनानं उपस्थित केला प्रश्न, म्हणाली…

मुंबई | अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. ती नेहमी कोणत्या न कोणत्या कारणावरुन कोणाशी न कोणाशी पंगा घेताना दिसते. अशातच कंगनानं आता बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे.

अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. 15 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यावर कंगनानं आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कंगनानं सोशल मीडिया पोस्ट मध्ये लिहिलं आहे की, आधी पंजाबमध्ये एक प्रथा होती. आपल्या दोन मुलांपैकी एका मुलाला हिंदू बनवायचं आणि दुसऱ्या मुलाला शीख बनवायचं. हीच पद्धत एक मुस्लीम आणि एक शीख किंवा एक मुस्लीम आणि एक हिंदू यांच्यामध्ये का नाही? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

पुढे कंगना म्हणते की, आमिर खानच्या घटस्फोटानंतर तिला अजून बरेच प्रश्न पडलेले आहेत. जेव्हा एक मुस्लिम आणि एक हिंदू एकमेकांसोबत लग्न करतात तेव्हा हिंदूनाच का मुस्लिम बनवलं जातं? हिंदूंना धर्म का बदलावा लागतो? जेव्हा एका परिवारामध्ये हिंदू, बौद्ध, शीख, राधास्वामी, नास्तिक हे सगळे लोक एकत्र राहू शकतात तर मुस्लिमसोबत लग्न केल्यानंतर धर्म का बदलावा लागतो?.

दरम्यान, आमिर आणि किरणने 2005 साली लग्न केलं होतं. ‘लगान’ या चित्रपटासाठी किरणनं सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं होतं. 2011 साली किरणने सरोगसीच्या आधारे मुलाला जन्म दिला. या दोघांना नऊ वर्षांचा आझाद हा मुलगा आहे.

थोडक्यात बातम्या – 

“खोटं कसं बोलावं हे महाविकास आघाडी सरकारकडून शिकलं पाहिजे”

‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरील शिल्पा शेट्टीच्या नृत्याने चोरलं चाहत्यांचं मन

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर आलं आर्थिक संकट, उपचारालाही नाहीत पैसे

मुहुर्त ठरला! ‘या’ दिवशी राहुल वैद्य आणि गर्लफ्रेंण्ड दिशा अडकणार विवाहबंधनात

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More