बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं?- कंगणा राणावत

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेला अभिनेत्री कंगणा राणावतने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं?, असा सवाल करत कंगणाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्री, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लोकसेवक असून तुम्ही अगदी शुल्लक गोष्टींवरुन संघर्ष करत आहात. तुमच्याजवळ असलेली सत्ता तुमच्या मताशी सहमत नसलेल्यांचा अपमाप करण्यासाठी, त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापरत आहात, असं कंगणाने म्हटलंय.

घाणेरडं राजकारण करुन मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी, असं म्हणत कंगणा राणावतने उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.

मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कुणी बनवलं? ते फक्त जनतेचे सेवक आहेत. त्यांच्यापूर्वी कुणी होतं, त्यांच्यानंतरही कुणीतरी त्यांची जागा घेईल, असंही कंगणाने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरेंना सर्व आयतं मिळालं आहे… सरकार पडणार असून हे शरद पवारांनाही माहीत आहे”

‘…तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल’; दिशा सालियान प्रकरणाचा धागा पकडत राणेंची मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका

फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना 100 पत्र; मात्र उद्धव ठाकरेंकडून एकाचंही उत्तर नाही!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण!

‘मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी’; कंगणा राणावतचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More