Kangana Ranaut | बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून खासदार बनली आहे. नुकतीच तिने लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. खासदार बनल्यानंतर आता कंगनाने मोठी घोषणा केली आहे. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत महत्वाची घोषणा केलीये.
कंगनाचा बहुप्रतीक्षीत ‘इमर्जन्सी’हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती खुद्द कंगनानेच केली आहे. या चित्रपटाबद्दलच कंगनाने मोठी अपडेट शेअर केली आहे. सध्या सर्वत्र तिच्या या पोस्टची चर्चा रंगली आहे.
‘इमर्जन्सी’ चित्रपटाची रिलीज डेट समोर
कंगनाने ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत म्हटलं की, “देशाच्या स्वातंत्र्याच्या पहिल्या 50 वर्षांची कथा… जो भारताचा सर्वात काळा काळा होता. ‘इमर्जन्सी’ सिनेमा 6 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त भागाची स्फोटक कथा जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे… चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.”, कंगनाची ही पोस्ट आता चर्चेत आलीये.
“इमर्जन्सी हा माझा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मणिकर्णिकानंतरचा हा सर्वांत मोठा प्रोजेक्ट आहे. यासाठी मोठे बजेट ठेवण्यात आले आहे. या चित्रपटासाठी अनेक प्रतिभावंत लोक एकत्र आले आहेत.”, असे कंगना (Kangana Ranaut )मागे म्हणाली होती. हा चित्रपट खरे तर 24 नोव्हेंबर 2023 मध्येच रिलीज होणार होता. मात्र, काही कारणांनी तो पुढे ढकलण्यात आला होता.
कंगनाचा बहुप्रतीक्षित चित्रपट येणार चाहत्यांच्या भेटीला
यानंतर अयोध्यामधील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये हजेरी लावल्यानंतरही कंगनाने पोस्ट करत चित्रपटाबद्दल माहिती दिली होती. तेव्हा हा चित्रपट 14 जून 2024 रोजी रिलीज होणार असल्याचं कंगनाने सांगितलं होतं.आज पुन्हा एकदा नवी पोस्ट करत कंगनाने रिलीज डेट सांगितली आहे. म्हणजेच चित्रपटाची रिलीज डेट आतापर्यंत तीनवेळा बदलण्यात आली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ‘इमर्जन्सी’ (Emergency) हा चित्रपट झी स्टुडिओ आणि ‘मणिकर्णिका’च्या निर्मात्यांनीच निर्माण केला आहे. या चित्रपटात कंगना (Kangana Ranaut ) व्यतिरिक्त अभिनेते अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्याही भूमिका आहेत. रितेश शाह यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) यांच्या जीवनावर आधारित आहे. यात कंगनाने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.
News Title- Kangana Ranaut Announced Film Emergency release date
महत्त्वाच्या बातम्या –
‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीच्या खुलाश्याने सिनेसृष्टी हादरली!
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; 10 वी पासही करू शकतात अर्ज
“हनिमूनच्या रात्री नवऱ्याने मित्राबरोबर माझा लिलाव..”; करिश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा
निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ; पाहा Video
“..तर कंगनाला राष्ट्रपती भवनातच ठेवायला हवं”; संजय राऊतांचा टोला