बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री कंगाना रनौतवर अटकेची टांगती तलवार, आज होणार सुनावणी

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. 14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्मह्त्या केली. त्यानंतर कंगनाने अनेक वादग्रस्त वक्तव्य करत अनेकांवर आरोप केले होते. याचवेळी तिने प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तरवर देखील अनेक आरोप केले होते.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने जावेदवर केलेल्या आरोपांमुळे दोघांच्यात वाद पेटला. तसेच जावेद अख्तर यांनी कंगना विरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला होता. या गुन्ह्याची सुनावणी 14 सप्टेंबर रोजी अंधेरी न्यायालयात होणार होती. मात्र सुनावणीसाठी कंगना उपस्थित नव्हती राहिली.

कंगना आजारी असून तिच्यात कोरोनाची लक्षणं दिसून आल्याने कोरोना चाचणी देखील करायची असल्याचं कंगनाच्या वकीलांनी स्पष्ट केलं. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलून 20 सप्टेंबर रोजी होणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. तसेच या दिवशी जर कंंगना उपस्थित राहिली नाही तर तिला अटक करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, 20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला कंगना उपस्थित राहिल की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कंगना आपली प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप केलेले जावेद अख्तर त्यांच्या पत्नीसोबत 14 सप्टेंबर रोजी हजर राहिले होते. मात्र कंगना न आल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

किरीट सोमय्यांचा हा दौरा म्हणजे केविलवाणा तमाशा- अमोल मिटकरी

‘कोरोनाला संपवण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक’, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

“…तर दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालेलं असेल”

‘मुख्यमंत्री तुम्ही भगवा सोडून हिरवा धारण करा पण…’, सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

पुण्यातील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड, तिथं चाललेला प्रकार पाहून पोलिसही हादरले!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More