Kangana Ranaut | हिमाचल प्रदेश मंडीमधील भाजप उमेदवार अभिनेत्री कंगना रनौत हिने कॉँग्रेसवर निशाणा साधत एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. तिने भारताला खऱ्या अर्थाने 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं असल्याचं म्हटलंय. इतकंच नाही तर, हिंदू राष्ट्राबाबतही तिने मोठं विधान केलंय.
“1947 मध्ये जेव्हा धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनवलं गेलं होतं. तर त्यावेळी भारताला हिंदू राष्ट्र घोषित का केलं नाही?”, असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे. निवडणुकीत कंगना सध्या जोरदार प्रचार करत आहे. या दरम्यानच तिने कॉँग्रेसवर निशाणा साधला.
“धर्मावरून पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्र बनवलं तर..”
“आपले पंतप्रधान युगपुरुष आहेत. आपल्या पूर्वजांनी मुघलांची गुलामी पाहिली, त्यानंतर इंग्रजांची गुलामी पाहिली आणि त्यानंतर काँग्रेसचं कुशासन पहायला मिळालं. पण आपल्याला खऱ्या अर्थाने 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं.”, असं अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) म्हणाली आहे.
कंगनाने पुढे सांगितलं , देशाला खऱ्या अर्थाने 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतली. मोदी सरकारने आपल्याला आपला धर्म न घाबरता आचरणात आणण्याचे आणि प्रदर्शित करण्याचे स्वातंत्र्य दिले. भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा दृष्टिकोणाला पुढे नेण्यासाठीची स्वातंत्र्यता दिली.
“आम्ही भारताला हिंदू राष्ट्र बनवू”
कंगनाने काँग्रेसवर निशाणा साधत भारताला स्वातंत्र्याच्या वेळी हिंदू राष्ट्र का घोषित केले नाही, असे म्हटले आहे.आम्ही आमच्या सरकारमध्ये भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दिशेने काम करू, असंही ती म्हणाली आहे. आता कंगनाचं (Kangana Ranaut) हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.
दरम्यान, भाजपाने कंगनाला मंडीमधून लोकसभेच्या मैदानात उभं केलंय. हा प्रदेश कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
News Title – Kangana Ranaut Big Statement on Hindu Rashtra
महत्त्वाच्या बातम्या-
आहारात प्रोटीन पावडरचा समावेश करताय? तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
मतदान करायला घराबाहेर पडण्याअगोदर ही बातमी वाचाच! अन्यथा थांबावा लागेल तासनतास रोडवर उभा
मनोरंजनसृष्टीत शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू
राजकारणात तापणार! निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली अत्यंत कडू शब्दात टीका