“भारतीयांनी आळशी होऊ नये, देश अजूनही..”; कंगना रनौतचं मोठं आवाहन

Kangana Ranaut | बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत आता खासदार बनली आहे. भाजपकडून हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून कंगनाने लोकसभा निवडणूक लढवली. यात कंगनाने कॉँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला. त्यामुळे कंगना आता राजकारणात देखील सक्रिय झाली आहे.

अशात कंगनाने वर्क कल्चरबद्दल मोठं विधान केलं आहे. कंगनाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर पंतप्रधान मोदी यांचा एक व्हिडीओ शेअर करत देशवसीयांना महत्वाचं आवाहन केलं आहे. तिची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे.

कंगना रनौतची पोस्ट चर्चेत

“स्वत:ला कामामध्ये व्यस्त ठेवण्याच्या प्रवृत्तीला सामान्य करण्याच्या गरजेवर भर द्यायला पाहिजे. भारतीयांनी कामात आळशी होऊ नये. कारण भारत अजून विकसित देश झालेला नाही.”, अशी पोस्ट कंगनाने (Kangana Ranaut) केली आहे. यासोबतच तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पीएमओमधील कर्मचाऱ्यांना संबोधन करतानाचा हा व्हिडीओ असून त्यात पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांच्या कामाच्या पद्धतीवर भाष्य केलंय. हाच व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत कंगनाने त्यावर आपलं मत नोंदवलं आहे.

कंगनाकडून भारतीयांना आवाहन

“आम्हाला कामामध्ये आवड असणाऱ्या लोकांची गरज आहे. विकेंडची वाट पाहणे आणि सोमवारी मीम्सच्या माध्यमातून कामाची तक्रार करणं थांबवलं पाहिजे. वेस्टर्न कल्चरमुळे अनेक लोकं आळशी झालेले आहेत. भारत देश अजून विकसित राष्ट्र नाही. आपण कामामध्ये आळशी होऊन चालणार नाही.”, असं कंगनाने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

तिची ही पोस्ट आता वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. नेटकरी देखील यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर कंगना (Kangana Ranaut) चर्चेत आली आहे. तिची ही पोस्ट आता व्हायरल होत आहे.

News Title :  Kangana Ranaut Big Statement on Work Culture

महत्त्वाच्या बातम्या-

देशातील प्रथम महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्या बायोपिकची घोषणा!

“मी त्याचा फोन उचलला नाही की तो मला शारीरिक…”,ऐश्वर्या रायने केला खुलासा

बाहेर पडताना काळजी घ्या! ‘या’ भागांत वादळी वाऱ्याचा पाऊस होणार

मोठी बातमी! मनोज जरांगे महायुतीला दुसरा धक्का देण्याच्या तयारीत

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत धुसपुस?; ‘या’ दोन नेत्यांमध्ये रंगला कलगीतुरा