बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“श्रीदेवीनंतर सातत्याने विनोदी भूमिका साकारणारी बॉलिवूडची मी दुसरी अभिनेत्री”

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते. तिच्या धाडसी, वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगणा नेहमी चर्चेत असते. अशातच कंगणाने आणखी एक ट्विट केलं आहे. यामध्ये कंगणाने आपली तुलना केली असून बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी कंगणाने स्वत:ची तुलना केली आहे. कंगणाच्या तनु वेड्स मनु या सिनेमाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानं कंगणाने एक ट्विट केलं आहे.

मी याआधी अतिशय निरुत्साही आणि विक्षिप्त भूमिका साकारायचे. मात्र या सिनेमानं माझ्या करिअरची दिशाच बदलली. या सिनेमानं मला मुख्य धारेत कॉमेडीमध्ये प्रवेश करुन दिला. तनु वेड्स मनुपासून सुरू झालेल्या विनोदी भूमिकेचा प्रवास क्वीनने आणखी वाढवला. श्रीदेवीनंतर सातत्याने विनोदी भूमिकेत असलेली बॉलिवूडची मी दुसरी अभिनेत्री आहे, असं म्हणत कंगणाने अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी तुलना केली आहे.

कंगणाने दुसर्‍या ट्विटमध्ये आनंद एल राय आणि लेखक हिमांशु शर्मा यांचे चित्रपटाबद्दल आभार मानले आहेत. जेव्हा तो हा चित्रपट घेऊन माझ्याकडे आला तेव्हा मला वाटलं की मी त्याचं करिअर बनवू शकते परंतु त्याने माझं करियर बनविलं. कोणता चित्रपट चालेल आणि कोणता चालणार नाही हे कोणीही सांगू शकत नाही, सगळं नशीब आहे.

दरम्यान, स्वत: ची श्रीदेवीशी तुलना केल्यानंतर सोशल मीडियावर कंगणाला  नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. काहींनी म्हटलं आहे की कंगणाचे ट्विट एक चांगले विनोद आहेत, तर काहीजण म्हणाले की कॉमेडियन भारती तुमच्यापेक्षा चांगली आहे.

थोडक्यात बातम्या-

“माझी बहिण प्रीतम, पंकजा मुंडे यांच्यासोबतही फिरली ते फोटो का व्हायरल करत नाही”

‘या’ खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून घेतली निवृत्ती

‘या’ पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; ‘या’ तारखेला होणार मतदान

संजय राठोड समर्थकांकडून गलिच्छ प्रकार सुरु, चित्रा वाघ यांना केलं जातंय टार्गेट!

सॅमसंगचा नवा स्मार्टफोन; कॅमेराच्या ‘या’ नव्या फिचर्स सोबत बरंच काही….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More