वाद चिघळला! कंगनाचे गंभीर आरोप अन् इमरान हाश्मीचे चोख प्रत्युत्तर

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना रनौत तिच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असते. ती सातत्याने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून बॉलिवूड कलाकारांना लक्ष्य करत असते. आता तिला अभिनेता इमरान हाश्मीने प्रत्युत्तर दिले आहे. बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी त्याची आगामी वेब सीरिज ‘शोटाइम’मुळे चर्चेत आहे. सध्या तो सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशातच इम्रानने आता घराणेशाहीच्या मुद्द्यावर उघडपणे भाष्य केले आहे. कंगनाच्या आरोपांना अभिनेत्यानेही प्रत्युत्तर दिले आहे. इम्रानने सांगितले की, कंगनाचे घराणेशाहीवरील विधान मला आश्चर्यकारक वाटले.

इमरान हाश्मी म्हणाला की, मला कंगना खूप आवडते. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक चांगली व्यक्ती देखील आहे. तिचा इंडस्ट्रीतील अनुभव चांगला नसावा. मी तिच्यासोबत एक हिट गँगस्टर चित्रपट केला आहे. त्या चित्रपटात मला खलनायकाची भूमिका मिळाली पण कंगना मुख्य भूमिकेत होती.

इमरान हाश्मीचे प्रत्युत्तर

तसेच गँगस्टर हा चित्रपट पूर्णपणे स्त्रीकेंद्रित होता. तर कंगना त्यावेळी इंडस्ट्रीत नवीन होती. अशा स्थितीत घराणेशाहीचा हा मुद्दा का पुढे आला हे मला समजत नाही. कोणीही संपूर्ण इंडस्ट्रीला ड्रग्जी म्हणू शकत नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे. इमरान हाश्मी हिंदी वृत्तसंस्था ‘दैनिक भास्कर’शी बोलत होता. यावेळी त्याने विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

इम्रान पुढे म्हणाला की, कोरोना काळ आणि सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर इंडस्ट्रीत घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मी स्वतः याच पार्श्वभूमीतून पुढे आलो आहे आणि मला विश्वास आहे की चित्रपटांमध्ये प्रवेश करणे आमच्यासाठी थोडे सोपे आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की, सर्वकाही आपल्याला दिले जाते. मला मान्य आहे की बाहेरच्या लोकांसाठी चित्रपटांमध्ये प्रवेश करणे खूप कठीण आहे. हे मी स्वतः पाहिले आहे. कारण बाहेरील लोकांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे ही खूप दूरची गोष्ट आहे. त्यांना दिग्दर्शकाशी बोलायला मिळणे ही देखील मोठी बाब आहे.

Kangana Ranaut ने केले होते आरोप

इम्रानच्या वर्क फ्रंटबद्दल भाष्य करायचे झाले तर, तो अलीकडेच सलमान खानच्या ‘टायगर 3’ मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता तो लवकरच त्याच्या शो टाइम या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, आगामी वेब सीरिजमध्ये इम्रान व्यतिरिक्त नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना, मौनी रॉय, राजीव खंडेवाल, श्रिया सरन, विजय राज हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिहीर देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

News Title- Bollywood actor Emraan Hashmi has responded to actress Kangana Ranaut’s allegations of nepotism
महत्त्वाच्या बातम्या –

केजरीवाल सरकारकडून महिलांना मोठं ‘गिफ्ट’, दिल्लीच्या अर्थसंकल्पात रामराज्याची चर्चा

WPL मध्ये RCB च्या शिलेदाराचा गगनचुंबी षटकार पण झालं मोठं नुकसान!

अश्लील व्हिडीओ व्हायरल! तिकीट मिळूनही भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार

IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल