बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुंबईत माझं एक घर-एक ऑफिस आहे, माझा एक्स मात्र वडिलांच्या घरात राहतो”

मुंबई | वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत, त्यातच कंगना आणि हृतिक यांच्यातील वाद सगळ्यांच्या परिचयाचा आहे. नुकतंच कंगनाने पुन्हा एकदा हृतिकवर ताशेरे ओढले आहेत.

कंगनाला तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे (हृतिकमुळे) अनेकदा Gold Digger म्हणजे पैशांसाठी लालची असल्याचं ऐकावं लागलं. यावरच कंगनाने एका मुलाखतीत या एक्स बॉयफ्रेंडला सडेतोड उत्तर दिलं आहे. कंगना म्हणाली, ‘की मला गर्व आहे की माझं स्वतःचं मुंबईत घर आहे शिवाय एक ऑफिसही आहे. तर दुसरीकडे माझा एक्स त्याच्या वडिलांनी दिलेल्या भाड्याच्या घरात राहतो आणि मित्रांना सांगतो की मी पैशांच्या मागे धावत असते.’

काही वर्षांपूर्वी जेव्हा मी एक्ससोबत (हृतिक) नातं तोडलं त्यानंतर सर्व कायदेशीर लढाई सुरु होती. त्यावेळी मी छोट्या शहरातून आली आहे आणि त्याच्या मागे पैशांसाठी धावते हा फार चर्चेचा विषय बनला होता. तेव्हा त्याने मला ‘Gold Digger’ असा टॅग दिला असल्याचंही कंगनाने सांगितलं.

नुकतंच कंगनाने सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा उचलून धरला होता. यानंतर सोशल मिडीयावर अनेक स्टार किड्सना ट्रोल करण्यात आलं.

ट्रेंडिंग बातम्या-

तुकाराम मुंढेंच्या आयुष्यात पहिल्यांदाच गैरव्यवहाराचा आरोप, महापौरांनी उचललं मोठं पाऊल!

आता लग्न आणखी ‘मंगल’ होणार, राज्य सरकारकडून या गोष्टीला परवानगी

महत्वाच्या बातम्या-

आमच्या औषधाने फक्त तीनच दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होणार; बाबा रामदेव यांचा दावा

जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण

भारत-चीन सैन्य चकमक प्रकरणी अमेरिकन गुप्तचर विभागाची धक्कादायक माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More