बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी देशातील सर्वात शक्तिशाली महिला आहे- कंगना रनौत

नवी दिल्ली | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कोणत्या न कोणत्या कारणाने सतत चर्चेचा विषय ठरते. कंगना आणि वादग्रस्त वक्तव्य हे जुनं समीकरण झालं आहे पण वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना अनेकदा अडचणीत सापडली आहे. अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कंगनाने आता स्वत:लाच एक उपाधी दिली आहे.

ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्यापासून कंगना तिच्या इंस्टाग्रामवर चांगलीच एॅक्टीव्ह झाली आहे. कंगनाने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एएनआयने दिलेल्या वृत्ताचं ट्विट शेअर केलं आहे. हे ट्विट शेअर करत कंगनाने स्वत:ला देशातील सर्वात शक्तिशाली महिलेची उपाधी दिली आहे. (Kangana Call herselft Most Powerful Women Of Country)

कंगनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत कंगनाच्या सर्व सोशल मीडिया पोस्टवर भविष्यात सेन्सॉर करण्याची मागणी केली आहे. देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही याचिका दाखल केली असल्याचं एएनआयने या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

कंगनाने हेच ट्विट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीत शेअर केलं आहे व सोबत ‘हा हा हा.. देशातील सर्वात शक्तिशाली महिला’, असं कॅप्शन दिलं आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने तिला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावाही केला होता. तर आता स्वत:ला सर्वात शक्तिशाली महिला म्हटल्याने कंगना पुन्हा चर्चेत आली आहे.

 


थोडक्यात बातम्या-

ओमिक्रॉनचा प्रसार आणखी वाढणार?; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

ATMमधून पैसे काढताय! मग जाणून घ्या ‘ही’ नवीन नियमावली

मोठी बातमी! उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात

kunal Kamra म्हणतो, “मी एक कोरोना व्हायरस आहे म्हणून…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More