बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; कंगणा रनौतचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली | 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला नुकतीच सुरुवात झाली. या सोहळ्यामध्ये भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल’ या संस्थेद्वारे राष्ट्रीय पातळीवर चित्रपटांचं समीक्षण करून विभागवार पुरस्कारांचं वितरण केलं जातं.

2020 मध्ये कोरोना महामारीमुळे हा पुरस्कार सोहळा होऊ शकला नव्हता. त्यामुळे, यावर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कंगणा रनौत हिला गौरविण्यात आलं आहे. मणिकर्णिका तसेच पंगा या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कंगणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या सोहळ्यामध्ये सामाजिक विषयावर मिळणारा पुरस्कार यावर्षी मराठी चित्रपटाने पटकावला आहे.  ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयांवरील चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘नॉन फिचर फिल्म’ विभागात हिंदी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ‘एन इंजीनियर्ड ड्रीम’ला मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत गाबाने यांनी केले आहे. स्पेशल मेंशन पुरस्कारात चार चित्रपट बिरियानी, जोना की पोरबा (आसमिया), लता भगवान करे (मराठी) आणि पिकासो (मराठी) यांचा समावेश आहे.

यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी फिचर फिल्म विभागासाठी एकूण 461 चित्रपटांचा समावेश होता. 2019 मधील मोस्ट ‘फिल्म फ्रेंडली स्टेट’ विभागात तेरा राज्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून हा पुरस्कार सिक्किमला जाहीर करण्यात आला आहे.

कोरोनामुळे मागील वर्षी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली नव्हती. जो पुरस्कार सोहळा 3 मे 2020 रोजी पार पडणार होता. तो पुरस्कार सोहळा आज पार पडला. त्यामुळे यावर्षी 2019 सालातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

महाराष्ट्रातील लाॅकडाऊनचा येत्या 2 दिवसात निर्णय होणार; राजेश टोपेंचं मोठं स्पष्टीकरण!

“काँग्रेसचा चप्पल उचल्या प्रवक्ता सचिन सावंत जनतेतून कधी आमदार होऊ शकत नाही”

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर पुण्याच्या महापौरांचा ‘हा’ मोठा निर्णय

राष्ट्रवादी आक्रमक; परमबीर सिंह यांच्या संपत्तीबाबत केली ‘ही’ मोठी मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More