मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावतचा आगामी चित्रपट ‘धाकड’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या कंगणा या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
कंगणाने या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं असून त्या पोस्टरमध्ये कंगणाच्या हातात तलवार आणि जवळच मृतदेह पडलेले दिसत आहेत. कंगणाच्या या डॅशिंग लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
पोस्टरमध्ये कंगणा राणावतच्या हातात तलवार असून सर्वत्र रक्त दिसत आहे. अशा अॅक्शन थ्रिलर फिल्ममुळे भारतीय सिनेमा वेगळ्या पातळीवर जाईल, असा निर्मात्यांचा दावा आहे.
धाकड हा अॅक्शनपट असून मोठा चित्रपट आहे. आतापर्यंत अशी शैली हिंदी चित्रपटांमध्ये वापरलेली नाही. मी चित्रपटात एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे आहे, असं कंगणाने म्हटलंय.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
25 वर्ष विना अपघात सेवा देणार्या एसटी चालकांना मिळणार ‘इतक्या’ हजारांचं बक्षीस- अनिल परब
“उद्धव ठाकरे यांनी कधीच बाहुबलीचं राजकारण केलं नाही”
उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण…- देवेंद्र फडणवीस
“ममतांचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन”
‘या’ गावात सुनेने सासूचा तर जावयाने सासऱ्याचा केला पराभव!