बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कंगणा राणावतला ‘या’ मतदारसंघातून खासदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता?

नवी दिल्ली | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत मागील काही महिन्यांपासून भाजपची जवळीक साधताना दिसत आहे. कंगणा मागील काही दिवसांपासून चित्रपटांमुळं कमी पण, राजकीय वक्तव्यांमुळेच जास्त चर्चेत आहे. मुळची हिमाचल प्रदेशची असणारी कंगणा राणावत आता निवडणुक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणुक होणार आहे. भाजपचे मंडी लोकसभा संघाचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचे मार्च महिन्यात निधन झालं होतं. त्यामुळं येत्या 30 ऑक्टोंबरला मंडी लोकसभा मतदार संघासोबत तीन विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुक होणार आहे.

हिमाचल प्रदेशमधील एका वृत्तसमुहाच्या माहितीनुसार, भाजपमधील काही नेत्यांनी कंगनाच्या नावाची शिफारस केली असल्याचं वृत्त हाती येत आहे. तसेच भाजपच्या केंद्रीय स्तरावर उमेदवाराबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, कंगणानं अद्याप उघडपणे निवडणुक लढवण्याची घोषणा केली नाही.

दरम्यान, कंगणा मुळची मंडी जिल्ह्यातील भांबला गावची आहे. कंगणाचा नुकताच तामिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात तीनं मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही कंगना राजकारणात येण्याच्या चर्चांना उधान आलं होतं. त्यामुळं कंगणा आता खरंच निवडणुक लढवते का हे आता काही दिवसांनंतरच समजनार आहे.

थोडक्यात बातम्या –

शाहरूख खानच्या अडचणी वाढल्या! ड्रग्ज प्रकरणात आर्यनने केला मोठा खुलासा म्हणाला; मी ड्रग्ज…

‘ते शिवसेनेत, मी काॅंग्रेसमध्ये आहे मग…’; साबणेंच्या आरोपावर अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर!

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जींचा मोठ्या मताधिक्याने विजय!

शाहरुखच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर सचिन वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शाहरुखच म्हणाला होता, “माझ्या मुलानं ड्रग्ज घ्यावेत, पोरींच्या मागं जावं, सेक्स करावा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More