Top News मनोरंजन राजकारण

‘कंगणा राणावत म्हणजे हिमाचलाचं सडलेलं सफरचंद’; या खासदाराची कंगणावर टीका

पंजाब | सध्या सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं बॉलिवूडच्या कलाकारांनी समर्थन केलंय. दरम्यान अभिनेत्री कंगणा राणावतेने या आंदोलनाला विरोध करणारे एक ट्विट केले होतं. याचवरून काँग्रेसच्या खासदाराने कंगणावर टीका केलीये.

पंजाबच्या लुधियानामधील काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी ट्विट करत कंगणावर टीका केलीये. या ट्विटमध्ये त्यांनी कंगणा राणावतला हिमाचलंच सडलेलं सफरचंद म्हटलंय.

खासदार रवनीत सिंह बिट्टू म्हणाले, “मी कंगणाला सांगू इच्छितो की पंजाबच्या लोकांच्या समस्यांमध्ये आम्ही बाहेरील लोकांना घुसू देत नाही. हिमाचलच्या सडलेल्या सफरचंदाने दूर रहावं.”

रवनीत सिंह बिट्टू यांच्या ट्विटला कंगणा काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

महत्वाच्या बातम्या-

“आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त; आम्ही कृती आणि अॅक्शनवाले”

“कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही”

कोरोनाच्या लसीचा डोस घेतलेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण!

पुण्यापासून जवळ असलेल्या ‘या’ भागात उद्यापासून संचारबंदी

लस हे अमृत नाही, जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत…- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या